कारमध्ये 01 लाख 12 हजार रुपयांच्या विदेशी दारुच्या बाटल्या; अवैध दारू वाहतुकीत चालक ताब्यात

shivrajya patra

सोलापूर : रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवेध धंद्यावर कारवाई करण्याकरीता पेट्रोलिंग करीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार मारुती सुझुकी कंपनीची वॅगनर कार रस्त्यात अडवून घेतलेल्या झडतीत त्या कारमध्ये सुमारे एक लाख दहा हजार रुपयांहून अधिक किंमतीच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या. चालक सिध्दाराम राचण्णा खजुरगी (वय-४५ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आलंय. या छाप्यात कारसह 03 लाख 12 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रमजान ईद च्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असलेल्या पोह/ गंगावणे, पोह/ नदाफ, पोह/ खान व पोकॉ/१४७७ यांना  ग्रे कलर मारुती सुझुकी वॅगनर या (एम.एच-२०/बी.वाय-७७८१) वाहनातून अवैधरित्या देशी, विदेशी दारुच्या बाटल्या जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्यानुसार १७ मार्च रोजी जोडबसण्णा चोक ते जिजामाता दवाखाना मार्गे सापळा लाऊन बसले असता, थोड्याच वेळात वॅगनर कार येत असल्याची दिसली. 

पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता, ती न थांबताच पुढे जात असताना त्यास जिजामाता दवाखाना ते जेलरोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस बगीचा जवळ थांबविण्यात पोलिसांना यश आले. ती वेळ २१.४५ वा. ची होती. चालकाचं नांव सिध्दाराम राचण्णा खजुरगी (धंदा-व्यापार रा. ४४, निलम नगर, श्रीशैल किराणा दुकानाजवळ, सोलापूर) असे असे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. 

त्यावेळी वाहनाची तपासणी केली असता, त्यात ११ खाकी पुठ्याचे बॉक्स व पाच पांढऱ्या पिशव्या दिसून आल्या. त्या बॉक्स व पिशव्यामध्ये विविध कंपनीचे विदेशी दारुचे विविध आकाराचे लहान-मोठ्या दारुचे बाटल्या आढळल्या. त्याची बाजारभावाने किंमत 01 लाख 12 हजार रुपये असल्याचे पंचासमक्ष झालेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले. या गुन्ह्यात कारसह 03 लाख 12 हजार रुपयाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे (परिमंडळ), सहा. पोलीस आयुक्त (विभाग-१) पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली व.पो.नि. शिवाजी राउत, पो.नि. भाऊराव बिराजदार (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहा. पोलीस निरीक्षक निलेश पाटील-सोनवणे, पोसई/सातपुते सफौ/शरीफ शेख, स.फौ./गजानन कणगीरी, पोह/४४ शेख, पोह/१३११ बाबर, पोह/१३८१ गंगावणे, पोह/१३१४ माने, पोह/१२५० धुमाळ, पोह/१०८१ नदाफ, पोशि/९८९ वायदंडे, पोशि/८८८ सांवत, पोशि/१९३९ जाधव, पोशि/१४७७ सिनारे, पोशि/१४७५ यसलवाड, पोशि/१४७५ देकाणे, यांनी पार पाडली.

To Top