तळे हिप्परगा येथे 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी विविध उपक्रम
सोलापूर : परमपूज्य श्री म. नि. प्र. मौन तपस्वी श्वेतशांत श्री श्री श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात मागील वर्षी तयार झालेल्या तळेहिप्परगा येथील समाधान आश्रमातील ध्यानमंदिराला एक वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्त वीरशैव लिंगायत समाजातील वधू वरांचा सामुदायिक विवाहाचे आयोजन रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दि. 15 रोजी रोजीपासून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गुरूदेव सेवा संस्थेचे डॉ.दामा आणि सिध्देश्वर किणगी यांनी दिली.
श्री गुरूदेव सेवा संस्थेच्या वतीने सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील तळे हिप्परगा गावात उभारण्यात आलेल्या समाधान आश्रमात ध्यान मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्याला एकवर्ष पूर्ण झाले.
मौनतपस्वी श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामी यांच्या सानिध्यात दि. 15 आणि 16 फेब्रुवारी या दोन दिवसात विविध उपक्रम होणार आहेत. त्यामध्ये दि. 15 रोजी सकाळी इष्टलिंग धारण कार्यक्रम, आरोग्य शिबीर, महास्वामीजींचे तुलाभार, पुस्तक प्रकाशन, सत्कार समारंभ आणि प्रवचन असा दिवसभर कार्यक्रम आहे.
त्याचबरोबर दि. 16 फेब्रुवारी रोजी वीरशैव लिंगायत सामुदायिक विवाहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या विवाहासाठी इच्छुक वधु वरांनी दि. 6 फेब्रुवारी रोजी पर्यंत आपली नावे योग्य कागदपत्रांसह नोंद करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमासाठी तोग्गीहळ्ळी पंच मठाचे पूज्य श्री ष. ब्र. संगमेश्वर शिवाचार्य महास्वामी, श्री हिरेमठ जडे येथील पूज्य श्री ष ब्र.धनबसव अमरेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे आर्शिवचन लाभणार आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. दामा दांम्पत्य, राजु शेट्टी, सिध्दू किणगी, मल्लू बिराजदार, महेश पाटील, संगतबसव स्वामी,दिपक टक्कळकी, तेल्लूर बंधू, अक्कलकोटचे बसु माशाळे, दत्तु कुमार साखरे, कांतु धनशेट्टी आदी परिश्रम घेत आहेत.