सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील ज्येष्ठ बागायतदार शेतकरी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बाबासाहेब नबीसाहेब शेतसंदी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी औराद येथे पार पडला. ते मृत्यूसमयी 93 वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात चार पुत्र, एक कन्या, सुना, नातवंडे, पणतवंडे असा मोठा परिवार आहे. तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुलतान शेतसंदी यांचे ते वडील होत.