डॉ. नारायणराव दासरी यांनी वैद्यकीय क्षेत्रात तब्बल सात दशकांहून अधिक काळ रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असणारे आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहावं, या उद्देशानं सात दशकापूर्वी सोलापूर तालुक्यातील बार्शी तालुक्यातील वैरागच्या अविकसित भागात स्वतःचा वैद्यकीय सेवा केंद्र सुरू केले
डॉ. दासरी यांनी वैराग इथं तब्बल पन्नास वर्षांहून अधिक काळ रुग्ण सेवा केली. त्यांनी रुग्णांच्या सोयीसाठी छोटेखानी दवाखाना थाटून अनेकांची सेवा केली.
त्यांच्या वाढदिवासाच्या निमित्तानं सकाळच्या सत्रात नातवंडासह त्यांनी पद्मशाली समाजाचे कुलदैवत भगवान चिरंजीव श्री मार्कंडेय ऋषी यांच्या सिध्देश्वर पेठेतील श्री मार्कंडेय मंदिरात मार्कंडेय महाऋषी यांचं दर्शन घेतले. यावेळी पद्मशाली युवक संघटनेच्यावतीने त्याचं सत्कार करण्यात आला.
वाढदिवस कार्यक्रमानंतर नातेवाईक, मित्र मंडळी यांच्यासह वैराग येथील त्यांचे स्नेही उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या.