मुंबई : बॉलीवुड महा अरोग्य शिबीर २०२५-तर्फे सोलापूरचे गायक मोहम्मद अयाज यांचा सत्कार करण्यात आला. हे महा आरोग्य शिबीर अंधेरी येथील चित्रकुट प्रांगणात आयोजित करण्यात आलं होतं. या शिबीरामध्ये हजारों कलावंत सामील होते.
या महाआरोग्य शिबीरात विना मुल्य संगीत सेवा दिल्याबद्दल मोहम्मद अयाज यांचा ज्येष्ठ अभिनेते धीरज कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी सिने अभिनेत्री पुनम धिल्लन, पद्मश्री सोमा घोष, खासदार निलाद्री सिंह, डॉ. धर्मेंद्र, उपासना सिंह, दिपक पराश, अली खान, संगीतकार दिलीप सेन, सुंदरी ठाकुर, माजी आमदार भारती लवेकर, टिनू आनंद, वैभव शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अशा सामाजिक उपक्रमात भाग घेऊन सदैव आपलं योगदान देणार असल्याचं महागायक मोहम्मद अयाज यांनी यावेळी सांगितले.
छायाचित्रात : अभिनेता दिग्दर्शक धीरज कुमार, पुनम जी, मोहम्मद अयाज, डॉ. धर्मेंद्र, अली खान यांच्यासह अन्य मान्यवर दिसत आहेत.