त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अभिवादन

shivrajya patra

सोलापूर : माता रमाईंनी भक्कम पाठबळ दिले, म्हणूनच महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रोन्नतीत, सामाजिक कार्यात अतुल्य योगदान देता आलं. त्यांचं जीवन हे आजच्या स्त्री शक्तीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले.

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या १२७ व्या  जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी भवन कार्यालयात माता रमाई यांच्या प्रतिमेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार आणि प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर बुद्धवंदना म्हणून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष पवार बोलत होते. माता रमाईंच्या त्यागमय जीवनातील काही प्रसंगाचे दाखलेही त्यांनी दिले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, महिला कार्याध्यक्ष चित्रा कदम, ॲडवोकेट सलीम नदाफ, अल्पसंख्यांक अध्यक्ष आमिर शेख, वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख, डॉक्टर सेल अध्यक्ष महेश वसगडेकर, वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष बसवराज कोळी, शामराव गांगर्डे, सोमनाथ शिंदे, तनवीर गुलजार, दत्ता बनसोडे, प्रज्ञासागर गायकवाड, प्रदीप बाळशंकर  यांची उपस्थिती होती.

To Top