सोलापूर : येथील माजी सरकारी वकील एस.आर. पाटील यांचे नातू हर्षद बसवराज कल्याणकर यांना अमेरिका येथील एरिझोना युनिव्हर्सिटी मधून एम एस (Aerospace/Aeronautical, Astronautically/Space Engineering) या विषयात पी.एचडी पदवी प्राप्त झाली आहे. डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पदवी प्रदान सोहळ्यात त्यांना ही पदवी युनिव्हर्सिटीत डिनच्या हस्ते देण्यात आली.
हर्षद कल्याणकर यांचं प्राथमिक शिक्षण मुंबई कांदिवली येथील ठाकूर विद्या मंदिरात तर बी.ई. मेकॅनिकल इंजिनिअरींग मुंबई वसई येथील विद्यावर्धिनी कॉलेज मधून पुर्ण केले. पुढील शिक्षणासाठी ते अमेरिका येथे गेले, अमेरिकेतील एरिझोना युनिव्हर्सिटी मधून एम.एस. डीग्री (Aerospace/Aeronautical, Astronautically/Space Engineering) या विषयांमधून डिग्री यशस्वीरित्या संपादीत केली. यावरच समाधान न मानता पुढे जाऊन कोव्हीड-२०२० मध्ये घरामधून आणि सुरळीत कॉलेज सुरु झाल्यावर, बऱ्याच अडथळ्यांना धैर्याने सामोरे जात वरील विषयात पी.एच.डी. डिग्री संपादीत केली.
युनिव्हर्सिटीच्या दिक्षांत पदवी प्रमाणपत्र (Convocation Degree Certificate) समारंभात त्यांना Doctorate ही पदवी सन २०२४ मध्ये बहाल करण्यात आली. या यशाबद्दल आई सुनंदा, वडील बसवराज कल्याणकर (रा. मुंबई) व आजोबा अॅडवोकेट एस. आर. पाटील यांनी हर्षदचे अभिनंदन केले आहे.या यशाबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.