कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्यावतीने प्रजासत्ताक दिन साजरा

shivrajya patra

सोलापूर : देशाच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझे सोलापूर समितीच्या वतीने ज्येष्ठ महिला विडी कामगार श्रीमती लक्ष्मी ईप्पा यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेना व मी सोलापूर माझा सोलापूर समितीच्या वतीने कुचन नगर पद्मशाली चौक येथील कामगार सेना कार्यालया समोर ज्येष्ठ विडी कामगार श्रीमती लक्ष्मीबाई ईप्पा यांच्या हस्ते व कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष व मी सोलापूर माझे सोलापूर समितीचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या प्रमुख उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी विठ्ठल कुराडकर, रेखा आडकी, पप्पू शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रशांत जक्का, नागार्जुन कुसुरकर, श्रीधर आडकी, यल्लप्पा मिठ्ठा, राधिका मिठ्ठा, सविता दासरी, पद्मा सामल, अनिता सुंचू, माधवी गौडा आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेना कार्यालयासमोर ज्येष्ठ विडी कामगार श्रीमती लक्ष्मी ईप्पा यांच्या हस्ते व कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या झेंडावंदन कार्यक्रमात बिडी कामगार बंधू-भगिनी विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती छायाचित्रात दिसत आहे.

To Top