पालकमंत्री गोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीची बैठक

shivrajya patra

सोलापूर : राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची व कार्यकारी समितीची बैठक नियोजन भवन सभागृह, शासकीय दुध डेअरी शेजारी सात रस्ता सोलापूर येथे गुरूवारी, 30 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता आयोजित करण्यात आलीय. 

या बैठकीस पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे  सदस्य उपस्थित राहणार आहेत.  तरी सर्व समिती सदस्य यांनी नियोजित वेळेपूर्वी समिती सभागृहात उपस्थित राहावं, असं आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी केलंय.

To Top