देहूरोड/पुणे : सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचे व चॅनल चे संपादक अक्षय हणमंत बबलाद यांना देहूरोड येथील बुद्धविहार कृती समिती, ऐतिहासिक धम्मभूमीच्या वतीने दिल्या जाणाऱ्या वृत्तरत्न या राज्यस्तरीय पुरस्काराने बुधवारी, २५ डिसेंबर रोजी सन्मानित करण्यात आले.
अक्षय बबलाद हे सामाजिक कार्यकर्ते असून प्रबुद्ध सांस्कृतिक चळवळीत त्यांचे विशेष योगदान आहे. सोलापुरात सुरू झालेल्या दैनिक 'लोकशाही मतदार' चे ते युवा संपादक असून अत्यंत कमी वयात त्यांनी लोकशाही मतदार या दैनिकाची निर्मिती करून अखंडपणे ते चालवित आहेत.
आजच्या युगात पत्रकारिता करणे अवघड कार्य असताना ते आवाहन स्वीकारून डॉ. आंबेडकरांची सामाजिक पत्रकारिता पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने लेखणीच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेला उपक्रम विधायक असल्याने त्यांची या वृतरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऐतिहासिक धम्मभूमीचे विकास प्रणेते भीमपुत्र टेक्सास गायकवाड होते.
युगनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९५४ सालीबुद्ध मूर्तीची स्थापना करून इतिहास घडविला व भारतातील पहिल्या बुद्धविहाराची स्थापना केली. त्या विहार स्थापनेचा म्हणजेच ऐतिहासिक धम्मभूमीचा ७० वा वर्धापदिन समारंभात हा वृतरत्न पुरस्कार इन्कमटॅक्स कमिश्नर विकास सूर्यवंशी (IRS मुंबई), अनिल कांबळे (उद्योजक) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रवक्ते डॉ. किर्तीपाल गायकवाड, प्रा. रतनलाल सोनाग्रा, प्रबुद्धरत्न प्रबुद्ध साठे, बसापाचे राज्य अध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे, बसपाचे नेते हुलगेश चलवादी, किरण आल्हाट, जेष्ठ अभिनेत्री सीमा पाटील, अभिनेते जॉली मोरे, मिलिंद कांबळे गुरुजी (कर्नाटक), डॉ. सी. एल. रात्रे (माजी आमदार), अंबादास शिंदे (अध्यक्ष, भारतीय दलित पँथर, महाराष्ट्र), संघपाल शिरसाट आदींसह हजारो अनुयायी उपस्थित होते.
यावेळी बुद्धविहार कृती समितीचे पदाधिकारी धर्मपाल तंतरपाळे, अशोक गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, अजय जगताप, अशोक सोनवणे, रंजना सोनवणे, मीना गायकवाड, प्रा.नितीन कांबळे, पत्रकार राहुल खांडेकर, यमराज इंगळे आदी मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले.