सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथील चंद्रकांत शरणप्पा डोमनाळे यांचं सोमवारी, ०२ डिसेंबर रोजी दुपारी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी ०८ वाजता हत्तुरे वस्ती येथील राहत्या घरापासून निघणार आहे. ते मृत्यूसमयी ६५ वर्षीय होते.
सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कुमठे परिसरातील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते उद्योजक सिध्दाराम डोमनाळे यांचे वडील होत.