Type Here to Get Search Results !

कुमठे येथील कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताहास प्रारंभ

सोलापूर : कुमठे येथील कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, कुमठे येथे क्रीडा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. या क्रिडा सप्ताहाचं उद्घाटन मंगळवारी, २४ डिसेंबर रोजी सकाळी संस्थेच्या विश्वस्त प्रा. स्वाती माने यांच्या हस्ते करण्यात आले. 

प्रारंभी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त प्रा. माने व प्रशालेचे माजी मुख्याध्यापक प्रकाश काशीद यांच्या हस्ते शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. ब्रह्मदेव माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कबड्डीचे मैदान व खो-खो चे मैदानाचंही विश्वस्त प्रा. स्वाती माने व प्रकाश काशीद यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 

विश्वस्त प्रा. माने यांनी, मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व शारीरिक तंदुरुस्ती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच प्रकाश काशीद यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व व खेळातून निर्माण होणाऱ्या संधी याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड, पर्यवेक्षक वसंत गुंगे, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सहकारी, स्पर्धेत भाग येणारे खेळाडू तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रशालेतील क्रीडा शिक्षक संजय घोडके यांनी केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक जयसिंग गायकवाड यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले.