सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवारी,२९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
पत्रकार दिनाचं औचित्य साधून दैनिक वृतपत्र व वृत्तवाहिन्याच्या पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. रविवारी, २९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता समाजकल्याण केंद्र, रंगभवन चौक इथं हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी मनगोळी हॉस्पिटलचे डॉ.अरूण मनगोळी, बिल्डर असोसिएशनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष संतोष कलकुटगी, दमाणी विद्या मंदिरचे संचालक नयनकुमार नोगजा, नट्स मिठाईचे प्रमुख भावेश शहा, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावं, असे आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अलकुंटे, महेश ढेंगले, अभिजित होनकळस, गणेश येळमेली, राजेश केकडे, महेश भाईकट्टी यांनी केलं आहे.
● चौकट -
... हे आहेत पुरस्काराचे मानकरी !
विशेष गौरव पुरस्कार संजय पाठक (दै.पुढारी)
तर आदर्श पत्रकार पुरस्कार -
श्रीनिवास दासरी (दै.दिव्यमराठी),
पद्माकर कुलकर्णी (आकाशवाणी केंद्र),
रणजीत जोशी (दै.एकमत),
अविनाश गायकवाड (दै.तरूण भारत),
रूपेश हेळवे (दै.लोकमत),
आफताब शेख (एबीपी माझा),
राजकुमार माने (दै.संचार),
गणेश कांबळे (दै.सकाळ)
परशुराम कोकणे (स्मार्ट सोलापूरकर)
आदी पत्रकारांचा पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.