Type Here to Get Search Results !

क्रीडा स्पर्धांमधून निर्माण होणारी संघ भावना देशासाठी उपयोगी आणावी : उपप्राचार्य वसंत गुंगे


कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन

सोलापूर : खेळाडूंनी क्रीडा मैदानावर चांगल्या प्रकारे खेळाचे प्रदर्शन करून आपल्या महाविद्यालयाचे नाव उज्वल करावे. अशा क्रीडा स्पर्धांमधूनच खेळाडूमध्ये संघ भावना निर्माण होते, हीच संघ भावना देशासाठी उपयोगाला आणावी. आपले शरीर बळकट करावे, मन, मनगट, मेंदु, सशक्त करावा, असे प्रतिपादन उपप्राचार्य वसंत गुंगे यांनी केले.

कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे विश्वस्त माजी नगरसेवक जयकुमार माने यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्त क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य वसंत गुंगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी लिटल स्टार इंग्लिश मिडीयमचे समन्वयक मलकारी कोरे, राष्ट्रविकासच्या मुख्याध्यापिका मंगला मोरे, अरुण नीळ, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. संजय जाधव उपस्थित होते. 

या स्पर्धेची नियमावली प्रा. दीपक शिंदे यांनी सर्व खेळाडूंना सांगितली. पहिल्या सामना 11 वी कला विरुद्ध 11 वी वाणिज्य या संघात झाला. या सामन्यात 11 वी कला संघाचा 8 खेळाडू राखून विजय झाला.

या स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून प्रा.राजीव निकम द्वितीय पंच म्हणून प्रा बंडोपंत बाबर यांनी काम केले. गुणलेखक म्हणून प्रा. विजयकुमार वाळके यांनी काम पाहिले, तर सामन्याचे समालोचन प्रा. हणमंत शिंदे यांनी केले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. दादाराव डांगे व  प्रा. विनोद थोरात यांनी परिश्रम घेतले.