Type Here to Get Search Results !

शिक्षणाधिकारी (माध्य.) कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिनाचे आयोजन

सोलापूर : शालेय शिक्षण विभागातंर्गत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर विभागाकडील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित / विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित सलंग्न सर्व शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रकारच्या तक्रारी व अडचणी असतात. सदर तक्रारी व अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी 3.00 वाजता  स्थळ : हरिभाई देवकरण प्रशाला, सोलापूर  येथे संवाद दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने संवाद दिन आयोजन अर्ज स्विकृतीचे निकष प्राप्त निवेदनावर कार्यवाही व इतर अनुषंघीक बाबीचा तपशिल सर्व संस्था/प्रशालेस कळविणेत आलेला आहे.

      वरील प्रमाणे जिल्ह्यातील सर्व शिक्षक /शिक्षकेत्तर संघटना, इतर शिक्षण विभागाशी निगडीत संघटना यांना आवाहन करण्यात येते कि, संवाद दिना दिवशी उपस्थित राहून आपले निवेदन,व इतर व्यवहार द्यावे. तसेच संवाद दिना करीता उपस्थित राहणाऱ्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या परवानगीने रजा मंजूर करुन घेऊन उपस्थित रहावं, असं शिक्षणाधिकारी (माध्यमिक,जि.प.) सचिन जगताप यांनी कळवलंय.