Type Here to Get Search Results !

अभिजीत जाधव ०२ जिल्ह्यातून तडीपार

 

सोलापूर : सामान्य नागरीकांना दमदाटी, शिवीगाळ करुन मारहाण करणे, बेकायद्याची पैसे काढून घेणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या अभिजीत रमेश जाधव (वय-२८ वर्षे) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय.

अभिजीत रमेश जाधव याच्याविरुध्द सन २०२०,२०२२ व २०२४ या कालावधीमध्ये गुन्हे दाखल असून त्याच्याविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडून पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांना तडीपार प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) यांनी कार्यवाही करुन अभिजीत रमेश जाधव  (रा. घ.नं. ४१०, मल्लिकार्जुन मंदिराचे बाजुस, गवंडी गल्ली, उत्तर कसबा, बाळीवेस, सोलापूर) यास सोलापूर व धाराशीव जिल्ह्यातून ०२ वर्षाकरीता तडीपार केलं आहे. त्यास तडीपार केल्यानंतर कर्नाटक येथे सोडण्यात आलेलं आहे.