Type Here to Get Search Results !

भालशंकर दाम्पत्य सामाजिक पुरस्काराचे मानकरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समितीच्या सामाजिक पुरस्काराचे थाटात वितरण 

मुंबई : बौद्ध धम्म प्रसार आणि सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सामाजिक पुरस्कार देऊन गौरव करण्याचा उपक्रम ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती मुंबईने सुरू केला असून पहिल्या पुरस्काराचे निलेश जाधव (मुंबई ) तसेच सोलापूरचे बुद्धजय भालशंकर आणि मोनाली भालशंकर हे दांपत्य मानकरी ठरले.

मुंबईत ऍनटॉप हिल परिसरात शालवन बुद्ध विहारात धम्मचक्र प्रवर्तन दिनी या पुरस्काराचे वितरण मोठ्या उत्साहात पार पडले. अभियंता बुद्धजय भालशंकर हे राज्य कर निरीक्षक असून ते विख्यात साहित्यिक आणि पत्रकार आहेत."भीमटोला " हा त्यांचा ग्रंथ महाराष्ट्रभर गाजतोय. त्यांच्या सुविद्य पत्नी मोनाली या इस्त्रोमध्ये अधिकारी आहेत.

समितीचे अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस आनंद जाधव, खजिनदार अजित जाधव, सुरेश तांडेकर, सुरेंद्र शेंडे, कपिल ढोरे, अर्चना सकपाळ, अविनाश जाधव, अनिल घाडगे, टी. डी. कांबळे, रमेश कदम, धम्मपाल जाधव, पंकज पाटील, सुनील अहिरे या मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आले.