सोलापूर : प्रतिवर्षीप्रमाणे दिवाळीच्या अगोदर कर्मचाऱ्यांचे पगार होत असतात. त्याला आचारसंहिता आडवी येणार नाही. तरी यंदाही दिवाळीच्या अगोदर महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे पगार व्हावेत, अशी मागणी कॉलेज कर्मचारी युनियनने विभागीय शिक्षण सहसंचालकाकडे केलीय.
विभागीय संचालक उच्च शिक्षण सोलापूर या कार्यालयातील विलास कदम यांची रिक्त पदावर प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल तसेच प्रज्ञा धर्मा कांबळे यांची सहाय्यक लेखापाल अधिकारी या रिक्त पदावरती नियुक्ती झाल्याबद्दल सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विभागीय शिक्षण सहसंचालिका डॉ. नलिनी टेंभेकर यांच्याकडे ही मागणी कॉलेज कर्मचारी युनियनने केली. यावेळी त्यांनी वरील कार्यालयाकडून मागणी केलेली आहे. त्यांच्या सूचना आल्यास दिवाळी अगोदर पगार करण्यात येतील, असे आश्वासन डॉ. टेंभेकर यांनी दिले.
यावेळी विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, सिद्धेश्वर स्वामी, युनियनचे खजिनदार राहुल कराडे, उपाध्यक्ष आनंद होटकर, मोहन सुरवसे, विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील संजय लगदिवे, राजरत्न शिवशरण आदी उपस्थित होते.