सोलापूर : भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन समारंभ दिनानिमित्त गुरुवारी, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ०९ वाजून ०५ मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण, सात रस्ता सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी व जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी विहित वेळेपूर्वी राष्ट्रीय पोशाखात ध्वजारोहण समारंभासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केलं आहे.