सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे उळेगांव येथे, ०४ ऑगस्ट, रविवार रोजी डांगे परिवारातर्फे दत्तात्रय डांगे यांच्या वडिलांची आई कै. रुक्मिणी डांगे व आईची आई कै. इंदुबाई मुळे यांचं नुकतंच निधन झालेलं असून त्यांच्या पुण्य स्मरणार्थ १११ वृक्षांची लागवड करण्यात आली.
सध्या उळेगांव हे एक प्रकारे वृक्षारोपण करण्यासाठी झपाटलेले आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये एकूण ४११ पेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली आहे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सोरेगाव येथील प्रसिद्ध डॉ. वैजनाथ कुंभार, इंजि. राजेश जगताप शाखा अभियंता, उमेश मळेवाडी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, राम जेऊरे, सरपंच अंबिका कोळी, उपसरपंच नेताजी भाऊ खंडागळे, ग्रा. पं सदस्य व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
९० वर्षीय २ आजींच्या स्मरणार्थ वृक्षारोपणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, असं म्हणून कुंभार व जगताप यांनी कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास डांगे व मुळे परिवाराने मेहनत घेतली, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप क्षीरसागर यांनी केले.