Type Here to Get Search Results !

उजनी धरणातून भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी घ्यावी खबरदारी - जिल्हाधिकारी


सोलापूर : कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमानगर, ता.माढा यांनी, 4 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रान्वये  दि.4 ऑगस्ट रोजी सकाळी 9.00 वाजता उपयुक्त पाणीसाठी 86% इतका झाला असून पाणलोट क्षेत्रामधील पुणे जिल्ह्यामधील पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागा मार्फत रेड अलर्ट देणेत आलेला आहे. दि.4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.00 वाजता उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीमध्ये पूर नियंत्रणासाठी 20000 क्युसेक्स विसर्ग सोडणेत आलेला आहे. तर हा विसर्ग आज रोजी पर्यंत 81600 क्यूसेक्स इतका झालेला आहे. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

•प्रत्यक्ष पुरस्थिती उद्भवल्यास-

Ø  सरकारी आज्ञेचे पालन करा आणि अधिक सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा.

Ø  सुरक्षित ठिकाणी रहा आणि योग्य ती माहिती गोळा करण्याच्या प्रयत्न करा.

Ø  विद्युत पुरवठा बंद करा आणि उघड्या तारांना स्पर्श करू नका.

Ø  अफवांमुळे घाबरून जाऊ नका आणि स्वत:ही अफवा पसरवू नका.

•तुम्ही घराबाहेर पडण्याची तयारी करत असाल तर-

Ø  आपले घर सुरक्षित ठेवा, हातात वेळ असेल तर बाहेरचे फर्निचर आत आणून ठेवा. महत्वाच्या वस्त वरच्या मजल्यावर हलवा.

Ø  तुम्हाला सुचना मिळाली असेल तर इलेक्टॉनिक उपकरणांचे मुख्या स्विचेस आणि वॉल्व बंद करा. सर्व विद्युत उपकरणे बंद करून ठेवा. तुम्ही पाण्यात असला किंवा ओले झाले असाल तर विद्युत उपकराणांना स्पर्श करू नका.

•पुरामुळे घर सोडावे लागल्यास, या गोष्टी लक्षात ठेवा-

Ø  वाहत्या पाण्यात चालू नका. प्रवाहाची सहा इंचापेक्षा जास्त असेल तर तुमचा तोल जाऊ शकतो. प्रवाही नसणाऱ्या पाण्यात तुम्ही चालू शकता. जमिनीवर पाय घट्ट ठेवण्यासाठी जमिनीची तपासणी करण्यासाठी एखादी काठी सोबत ठेवा.

Ø  पूर आलेल्या भागांमध्ये जाऊ नका. जर तमची गाडी पाण्याखाली जाणार असेल तर ती तशीच राहू द्या आणि तुम्ही सुरक्षित स्थळी धाव घ्या. पाण्याच्या प्रवाहात तुम्ही आणि तुमचे वाहन वेगाने वाहून जाऊ शकते.

•जर तुमच्या आजूबाजूच्या भागात पूर आला असेल तर-

Ø  माहितीसाठी रेडिओ किंवा टीव्ही ऐका.

Ø  अतिवृष्टीमुळे पूर येऊ शकतो हे लक्षात ठेवा. पावसामुळे पूर येण्याची शक्यता असल्या उंचावर जाऊन थांबा. त्यासाठी कोणाच्याही सुचनेची वाट पाहून नका.

Ø  प्रवाह,ड्रेनेज चॅनेल, कॅनल आणि पुराचा धोका असणाऱ्या प्रदेशांमध्ये सावधान राहा. अशा भागांमध्ये कोणत्याही पुर्व इशाऱ्याशिवाय पूर येऊ शकतो.

•पुरस्थितीत काय करावे काय करू नये, इथे वाचा-

Ø  विद्युत आणि गॅस उपकरणे व मुख्य स्विचेस बंद करा.

Ø  आपात्कालीन किट सोबत ठेवा आणि तुमचे मित्र आणि कुटुंबियांना तुम्ही कोठे जात आहत हे कळवा.

Ø  पुराच्या पाण्याशी संपर्क टाळा. हे पाणी गल, तेल, रसायने किंवा इतर पदार्थामुळे दूषित असू शकते.

Ø  तुम्हाला जर पाण्यात उभे राहायचे असेल तर खांब किंवा काठीचा वापर करा. पाण्याची खोली तसेच ड्रेनेजचे खड्डे आणि नाले तपासा.

Ø  विजेच्या तारांपासून लांब रहा कारण पाणी हे विद्युतप्रवाहाचे वाहक आहे. वजी कंपन्यांकडे खाली पडलेल्या विजेच्या तारांविषयी तक्रार करा.

Ø  पूराचे पाणी ओससलेल्या जमिनीवरून चालताना काळजी घ्या.

Ø  ढिगाऱ्याखालील जमिनी व फरश्यांवर फुटलेल्या काचा, अणकुचीदार वस्त,खिळे इ. वस्तू असू शकतात. चिखल आणि गाळ साचलेल्या जमिनिवरून पाय घसरण्याची भीती असते.

Ø  अद्ययावत माहिती व बातम्या मिळण्यासाठी रेडिओ किंवा टेलिव्हीजन ऐका.

Ø  इमारतीचे छत ओले झाले असेल तर वीज बंद करा. जिथून पाणी गळत असेल तेथे बादली ठेवा आणि छताला लहानसे छिद्र पाडा जेणेकरून त्यावरील भार थोडा कमी होईल.

Ø  खोलीतील पाणी काढून टाककरण्यासाठी बादल्या, स्वच्छ टॉवेल आणि कपड्यांचा वापर करा.

Ø  फर्निचर आणि ओल्या कार्पेटमध्ये ॲल्युमिनिअम फॉइल शीट ठेवा.

•हे करू नका-

Ø  वाहत्या पाण्यातून चालू नका. त्यामुळे तुमचा पाय घसरण्याची भीती आहे.

Ø  वाहत्या पाण्यामध्ये पोहू नका. यादरम्यान वाहून जाण्याची किंवा एखाद्या वस्तूला धडकण्याची दाट शक्यता असते.

Ø  पुरग्रस्त भागातून वाहने नेऊ नका. तुम्हाला त्या परिसरातील अउथळ्यांचा अंदाज येणान नाही. तसेच अवघ्या अर्धा मीटर पाण्यात वाहन वाहून जाण्याची दाट शक्यता असते. तसेच पुरग्रस्त भागातून वाहने चालवताना आजूबाजूच्या मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.

Ø  पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले कोणतेही अन्न खाऊ नका.

Ø   एखाद्या एक्पर्टने तपासणी केल्याशिवाय वीजेचा वापर सुरू करू नका. गॅस गळतीबाबत सावध रहा. मेणबत्या कंदील किंवा कसलीही ज्योत पेटवू नका.

Ø  वस्तुवरील चिखल घासण्याचा प्रयत्न करू नका. यामुळे मालमत्तेचे आणखी नुकसान होऊ शकते.

Ø  छत ओले असताना त्याला जोडलेली उपकरणे वापरू नका.

Ø  ओल्या फरशीवर उभे राहून टीव्ही, व्हीसीआर, सीआरटी टर्मिनल किंवा इतर इलेक्ट्रीकल उपकरण सुरू करू नका.

Ø  व्हॅक्युम क्लीनरचा वापर करून साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न करू नका.

Ø  तळघरातील पाणी बाहेर काढण्याची घाई कनू नका. गरजेपेक्षा अधिक कमी वेळात पाण्याचा दबाब कमी झाला तर भिंतीवर ताण वाढू शकतो.