Type Here to Get Search Results !

दु:खद ... ! डॉ. सूर्यकांत कांबळे यांचे निधन; सोमवारी अंत्यसंस्कार


सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) मधील निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत उर्फ बाळासाहेब कांबळे यांचं मुंबईत रविवारी रात्री निधन झाले. ते मृत्यूसमयी ७२ वर्षीय होते.

त्यांची अंत्ययात्रा, सोमवारी, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. होटगी रस्त्यावरील मोहिते नगर सप्तगिरी सोसायटी येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे, असं सांगण्यात आलंय. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.