'आई तुळजाभवानी' लवकरच येणार 'कलर्स मराठी' वर

shivrajya patra


महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कोट्यवधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या व साडे तीन शक्ती पीठापैकी एक पीठ म्हणजे 'आई तुळजाभवानी'... !

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी 'कलर्स मराठी'वर विविध धाटणीच्या, वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता 'आई तुळजाभवानी' ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या मालिकेचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

भक्तांच्या हाकेला त्वरित धाऊन येणारी, स्वराज्य रक्षिण्या तळपती तलवार भेट देणारी 'आई भवानी', अवघ्या महाराष्ट्राची 'कुलस्वामिनी' अर्थात 'आई तुळजाभवानी' लवकरच प्रेक्षकांना आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहायला मिळणार आहे.



To Top