सोलापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सामान्यांतील सामान्य आणि गरजू जनतेच्या हिताचा व्हावा, या सामाजिक जाणिवेतून जनआधार फाऊंडेशनच्या वतीने सोमवारी, २२ जुलै रोजी गरजू आणि वंचित घटकातील जनतेला १११ ब्लॅंकेट्सचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांनी दिली.
अलिकडे वाढदिवस साजरा करणे म्हणजे बॅनर-पोस्टरबाजी असते. अशा वायफळ खर्चाला फाटा देत जनआधार फाऊंडेशन केवळ सामाजिक हिताचे उपक्रम राबवित आले आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गेल्या ५ वर्षात गत वर्षी ब्लॅंकेट तर त्यापूर्वी शैक्षणिक साहित्य, आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड वितरण, अनाथ आश्रमामध्ये भोजन व धान्य पुरवठा असे विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. यंदा १११ गरजूंना ब्लँकेट्सचे वाटप करण्यात येणार असून तो सोमवारी पूर्णत्वास जातोय. समाजातील वंचित, पिडीत घटकांना मदत करण्याचा जनआधार फाऊंडेशनचा प्रयत्न असतो, असं संस्थापक आनंद गोसकी यांनी सांगितले.