भंडारा/विशेष प्रतिनिधी : भारतीय विद्यार्थी मोर्चा या राष्ट्रव्यापी संघटना भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी सतत कार्य करत असतात. त्याचाच एक भाग म्हणून भारतातील 550 जिल्हा भरात जिल्हा स्तरावर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थी लोकांना प्रशिक्षण लाभ घेता यावा यासाठी ओयासिस अकेडमी जिल्हा परिषद चौक भंडारा ( समाज कल्याण ऑफिस च्या विरुद्ध बाजूला )भंडारा येथे केले आहे. BVM ,BYF , BBM, RACS, BVCS, IRSA, BVCS ,हे बामसेफ या राष्ट्रव्यापी संघटनेचे सहयोगी संघटना असून या संघटनेचे उद्देश देशातील व्यवस्था परिवर्तन करणे आहे.
हे संघटन देशातील 550 जिल्ह्यातील 5500 तालुक्यातील आणि 5 लाख गावांमध्ये कार्यरत असून या संघटनेत समस्त मूलनिवासी बहुजन ( ओबीसी , एस सी , एस टी , एन टी , डी एन टी , वी जे एन टी , आणि धार्मिक अल्पसंख्याक ) समूहातील विद्यार्थी , युवा , बेरोजगार काम करत आहेत. कोणतेही संघटन दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी संघटनेचे कार्यकर्त्यांनी प्रशिक्षित व दक्ष असणे अनिवार्य आहे, म्हणून समस्त मूलनिवासी बहुजन समाजातील विद्यार्थी, युवा, बेरोजगार, यांना त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, मानसिक, राजकीय, समस्या प्रति जागरूक व जागृत करण्यासाठी सदर जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. रत्नाकर बांडेबूचे (प्रसिध्द मानसोपचार तज्ञ, भंडारा) प्रशिक्षण म्हणून भारतीय युवा मोर्चा परवेज शेख (महाराष्ट्र राज्य) राहणार आहेत, या करिता समस्त मूलनिवासी बहुजन समाजातील विद्यार्थी डॉक्टर, वकील, इंजिनिअर, प्राध्यापक, पोलीस, शिक्षक, विद्यार्थी व इतर कर्मचारी, शेतकरी, कष्टकरी व महिलांनी हजारो च्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा, असं आवाहन भारतीय विद्यार्थी मोर्चा चे प्रदेश महासचिव मोनू तुरकने विदर्भ महासचिव सौरभ मेश्राम व इंडियन रिसर्च स्कॉलर असोसिएशनचे अभय डी रंगारी यांनी केलं आहे.