मोहोळ : शिक्षण विभाग पंचायत समिती मोहोळ प्राथमिक विभागामार्फत समावेशित शिक्षण अंतर्गत विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना साहित्य साधने वाटप कार्यक्रम अंतर्गत जिल्हा परीषद प्राथमिक उर्दू शाळा, गुलशन नगर मोहोळ केंद्र येथील रिहालबी अफरोज शेख या दिव्यांग विद्यार्थीनीस व्हील चेअर साहित्य साधने प्राप्त झाली.
मोहोळ बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी बंडू शिंदे, विषय तज्ञ सुहास जाधव, व गटसाधन केंद्राचे प्रमुख व विद्यार्थीनीचे पालक अफरोज शेख व आई उपस्थित होते.
अन्सारी महेमुद अहमद विज्ञान शिक्षक व मुख्याध्यापिका नदाफ मॅडम, बागवान मॅडम आणि बांगी मॅडम यांनी साहित्य प्राप्त होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.