उपमुख्यमंत्री लोकनेते देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस सेवा दिन; जनआधार फाउंडेशनच्या वतीने १११ ब्लँकेट्सचे वाटप

shivrajya patra

सोलापूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लोकनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा दिन' म्हणून साखर पेठेत दरवर्षी प्रमाणे यंदाही जनआधार फाउंडेशनच्या वतीने आनंद गोसकी यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक जनहिताचे उपक्रम राबवून देवेंद्र फडणवीस यांचं अभिष्ठचिंतन करून शुभेच्छा देण्यात आल्या.

साखर पेठ भागातील उद्योगपती गणेश गुज्जा, जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांच्या प्रमुख उपस्थितीत या भागातील तसेच गरजू मनोरूग्णांना  ५४ व्या वाढदिवसानिम्मित्त १११ गरजूंना साखर पेठ येथील विणकर बागेसमोर ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. 



जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करताना, सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक सुविधेचा विचार करुन प्रधानमंत्री 'आयुष्यमान भारत' दोन हजारांपेक्षा अधिक गोल्डन कार्डचे वितरण केले होते. या गोल्डन कार्ड च्या माध्यमातून ०५ लाख रूपयांपर्यंत शासनाने ठरविलेल्या काही हाॅस्पिटलमध्ये मोफत उपचार होतो, त्याचबरोबर पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप, अनाथ आश्रम येथे भोजन व्यवस्था, अन्नधान्य वाटप असे अनेक उपक्रम राबवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

भाजप प्रदेश कार्यालयाने शुभेच्छा जाहिरातीला फाटा देण्याचे आवाहन केले. त्यानुसार उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यावर्षी १११ ब्लॅंकेट वाटप असे अनेक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी सांगितले.



सुत्रसंचालन प्रा. संदिप क्षिरसागर यांनी केले. यावेळी जनआधार फाऊंडेशनचे महेश दासी, शुभ मिठ्ठा,ऋषिकेश चिलवेरी, शाम कोटा, मोहन पेगड्याल, दिलीप मुमुडले, आकाश बुर्ला, दिनेश श्रीकोंडा, संतोष क्यातम, शंकर म्हंता, मधुकर बल्ला यांच्यासह असंख्य कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.

....चौकट ....

भा. ज. प. प्रदेश कार्यालयाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून पोस्टरबाजीला फाटा

लोकनेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाचे नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर-पोस्टर लावणार नाहीत. तसेच वृत्तपत्रातून/टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रदेश कार्यालयाकडून करण्यात आले. प्रदेश कार्यालयाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत जनआधार फाऊंडेशनने सेवाकार्यात अधिकाधिक योगदान म्हणून ब्लॅकेंट वाटप करण्यात आल्याचे जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी सांगितले. 

To Top