सोलापूर : महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अयाज 'जिक्र उसका' या मैफलीत मोनिका सिंग व सुनैना यांच्या शायरी-कविता संगीतबद्ध करुन आपल्या पहाडी आवाजात सादरीकरण करणार आहेत. हा कार्यक्रम रविवारी, २१ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी रंगभवन येथे आयोजित करण्यात आलाय. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याचेही संयोजकांनी सांगितलंय.
सोलापूरच्या अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या संकल्पनेतून " जिक्र उसका " गझल आणि शायरीतून उलगडणारा एक संगीतमय प्रवास खास असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. यावेळी सुनैना काचरु सहभागी होणार आहेत. सोलापूरचे सुपुत्र मोहंम्मद अयाज असा त्रिवेणी सूर संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
मोनिका सिंग हे एक सनदी अधिकारी असून, त्यांनी कवी म्हणून छंद जोपासला आणि ते शायरीच्या रुपात जिक्र उसका सादरीकरण करणार आहेत. या कार्यक्रमात खास अमेरिकामध्ये वास्तव्य असणाऱ्या भारतीय सिने कवयित्री सुनैना काचरु येणार आहेत.
काचरु या एक नामवंत लेखिका असून सोनू निगम, शंकर महादेवन, सुनिधी चौहानसारखे कलावंत त्यांच्या कविता, गीते गायलेली असून अनेक चित्रपटांसाठी ते लेखन केलंय, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे.
गझल और शायरी की अनोखी मैफल नक्कीच सोलापूर रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ठरणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला असून तरी जास्तीत- जास्त रसिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असं आवाहन करण्यात आलंय.