Type Here to Get Search Results !

... लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना द्यावं संरक्षण; संभाजी ब्रिगेडची मागणी


सोलापूर : युवतीशी दुष्कर्म करून हत्येनंतर तिच्या शवाची विटंबना केलेल्या गुन्हेगारास तातडीने फाशी देण्याची मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने, संशयित आरोपीच्या छायाचित्रास महिलांच्या हस्ते फाशी दिलीय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणींना पैसे देण्यापेक्षा त्यांना तातडीने संरक्षण द्यावं, अशी मागणी यावेळी व्यक्त करण्यात आलीय. 

नवी मुंबई उरण येथील युवतीशी दुष्कर्म करून तिच्या शरीराची विटंबना केल्याचा संशयित दाऊद शेख याला तात्काळ फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुळे सोलापूर भागातील दत्त मंदिर येथे संशयिताच्या प्रतिमेला जोडमार आंदोलन करून त्याच्या  प्रतिकात्मक पुतळ्याला महिलांच्या हस्ते फाशी देऊन त्या अमानुष घटनेचा निषेध नोंदविण्यात आलाय. 

यावेळी संभाजी ब्रिगेडची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, जिजाऊ ब्रिगेडच्या लता ढेरे, शुभांगी लचके, रेखा जाधव, आर्या लचके, सुरेश पाटील, दीपक जाधव, नितीन देवकते, राजू माने, श्रवण साळुंखे, रोहित साळुंखे, निलेश आवटे, सुमित माने, मोहन गोंडा, दीपक जाधव, सुरेश पाटील, सिताराम कोरे, अविनाश रस्ते, विनायक मोती, युवराज ताकमोगे, रमेश भंडारे, मल्लिकार्जुन शेवगार, राजे चव्हाण, महेश भंडारे, रमेश चव्हाण, हनुमंत शरणार्थी, सोन्या गवळी, तेजस शेळके, रुपेश कुमार किरसावळगी, शेखर चौगुले, सिताराम बाबर, रमेश चव्हाण, लखन गायकवाड आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.