सराईत घरफोड्या शहर गुन्हे शाखेच्या कचाट्यात; १.७ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त

shivrajya patra

सोलापूर : शहर गुन्हे शाखेच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार हैदराबाद रस्त्यावरील पशु चिकित्सा दवाखान्यासमोर सोन्याचे दागिने विक्रीसाठी थांबलेल्या एका संशयित सपोनि पाटील व त्यांच्या पथकाच्या कचाट्यात सापडला. सुखदेव ऊर्फ बंडू हणमंत नाईक (वय-२६ वर्षे) असं त्याचं नांव असून त्याच्या ताब्यातून १लाख ७० हजार रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले. त्यानं ते दागिणे चोरीचे असल्याची कबुली दिलीय.

१५ जुलै रोजी सायंकाळी ०७ ते ०७.४० वा. च्या दरम्यान वसंत विहार येथील, सायली हाईटस अपार्टमेंटमधील फ्लॅटचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यानं घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सौ. कुसूम मिश्रा यांनी दिली. त्यानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील स.पो.नि. विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास, २० जुलै रोजी मिळालेल्या खबरीनुसार चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी मार्केट यार्डाजवळ थांबलेल्या सुखदेव ऊर्फ बंडू हणमंत नाईक (रा.मु. खोराडी वस्ती, पोस्ट- आरग, ता. मिरज, सांगली जिल्हा) याला ताब्यात घेण्यात आले. 

त्याच्या अंगझडतीत त्याच्या ताब्यातुन, सोन्याच्या बांगड्या, चैन व तीन अंगठ्या असे एकूण ५३ ग्रॅम वजनाचे १ लाख ७१ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. त्यानं ते दागिणे चोरीचे असल्याची कबुली दिली असून तो आंतर जिल्हा सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राज कुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे शाखा) सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./ विजय पाटील व पोलीस अंमलदार दिलीप किर्दक, राहुल तोगे, आबाजी-सावळे, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विठ्ठल यलमार, प्रविण शेळकंदे, वसिम शेख, शांतीसागर जेनुरे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली.

To Top