सोलापूर : येथील एम. ए. पानगल अँग्लो-उर्दू हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय,सोलापूर येथे यावर्षी NEET परीक्षेत उल्लेखनिय यश संपादन केले. या उत्कृष्ट यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. उमर फारुख मुल्ला, अब्दुल रशीद शेख, प्राचार्य डॉ. हारून रशीद बागबान, महंमद अहमद फराज अन्सारी, तौफिक शेख, अल्ताफ सिद्दीकी, झेबा शेख, शगुफ्ता शेख, नग्मा मुजावर यांच्यासह अन्य शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
या वर्षी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत अरीज जवाद अली पाशा यांनी ५८७ गुण (९५.६७; परसेंटाईल), सानिया झाहरा मोईनुद्दीन शेख ५५८ गुण (९४.३५ परसेंटाईल), अब्दुल मनान अल्ताफ मेंदर्गी ५२६(९२.५६ ), इरम साजिद रचभरे ५१५(९१.९१ परसेंटाईलट), असफिया मुहम्मद अहमद फराझ अन्सारी ४८७ (९०.१६ परसेंटाईल), इफत मारिया फरमानुल्लाह खान पठाण हिने ४६७ गुण (८८.८३ पर्सेंटाईल) मिळवले. याशिवाय सालेहा अब्दुल सत्तार शेख,आयशा जुबेर शेख आणि सुमामा मुहम्मद हारून रशीद बागबान आणि इतर विद्यार्थ्यांनी नेट व जे ई मध्ये उत्कृष्ट यश मिळविले. तसेच सुमामा मुहम्मद बागबान याने AME-CET (एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनीअरिंग) मध्ये २०८ गुण मिळवून यश संपादन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्ताफ सिद्दीकी, मोहसीन मशाल, नविद मुनशी, इब्राहिम शाहपुरे, महमूद खतीब, दर्जी मॅडम, सना मुल्ला, झैनब कातनघर, रजिया शेख व इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.