Type Here to Get Search Results !

परदेश बनावटीची अडीच लाख रुपयांहून अधिक किंमतीच्या सायकलची चोरी



सोलापूर : परदेश बनावटीची अडीच लाख रुपयांहून  अधिक किंमतीची सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेलीय. ही घटना दक्षिण सदर बझारमधील लक्ष्मीनारायण अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी, ०७ जून रोजी सकाळी घडलीय. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, लक्ष्मीनारायणअपार्टमेंटमधील रहिवासी केतन श्रीकांत कसबे याने त्याच्या मालकीची,परदेश बनावटीची पोर्च कंपनीची निळ्या रंगाची महागडी सायकल अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये हॅण्डल लॉक करून ठेवली होती. चोरट्याने ती इम्पोर्टेड सायकल चोरून नेली. हा प्रकार निदर्शनास आल्यावर केतन कसबे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस नाईक माडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.