Type Here to Get Search Results !

कोंडी येथील विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालयाची गरुड झेप; तिन्ही शाखांचा शंभर टक्के निकाल...!


उत्तर सोलापूर : तालुक्यातील कोंडी येथील जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विजयसिंह मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या येथील तिन्ही शाखेचा निकाल १०० टक्के लागला. या निकालाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखलीय.

कोंडी येथील माळरानावर दर्जेदार शिक्षण मिळत असून शंभर टक्के निकालाची परंपरा महाविद्यालयाने कायम राखली. यंदा कला वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेच्या माध्यमातून १६७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. उत्तुंग यशाची परंपरा कायम राखल्यामुळे यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व विद्यार्थी विशेष प्राविण्य घेऊन उत्तीर्ण झाले. तिन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला.

विज्ञान  शाखा :

प्रथम क्रमांक:- अजिंक्य विनय कुलकर्णी : 89.50 टक्के

दुसरा क्रमांक :- प्रज्ञेश  श्रीधर चव्हाण : 87.17 टक्के

तृतीय क्रमांक:- साक्षी कैलास दुलंगे: 81.67 टक्के

कला शाखा :

प्रथम क्रमांक:- आरती सिद्राम वाघमारे: 73.83 टक्के

द्वितीय क्रमांक :- निसर्गा काशिनाथ बामगोंदे : 70.17 टक्के

तृतीय क्रमांक :- संजना अनिल सुरवसे : 66 टक्के

वाणिज्य शाखा :

प्रथम क्रमांक:- प्रणाली तुकाराम भोसले: 70.83 टक्के

द्वितीय क्रमांक:- आदित्य देवीदास वाघमारे: 69.67 टक्के

तिसरा क्रमांक:- 1)प्रियांका अनिल जाधव: 69.33 टक्के

2) सूरज तानाजी पंडित : 69.33 टक्के

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष गणेश निळ उपाध्यक्ष सिताराम पाटील, संचालक योगेश निळ, दीपक निळ, प्राचार्य सुषमा नीळ प्रा. दादासाहेब नीळ, वैभव मसलकर, दीपक भोसले, संकेत मोरे, माऊली भोसले यांनी अभिनंदन केले असून सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.