Type Here to Get Search Results !

पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांना मातृशोक; शनिवारी अंत्यसंस्कार


सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील पार्वती विश्वनाथ स्वामी (वय ६५ ) यांचे अल्पशः आजाराने शुक्रवारी, २४ मे रोजी रात्री निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या शनिवारी, सकाळी साडे दहा वाजता त्यांच्या मंद्रूप येथील राहत्या घरापासून निघणार आहे. 

त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना-नातवंडे असा परिवार आहे. दक्षिण सोलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष पंचाक्षरी स्वामी यांच्या त्या मातोश्री होत.