विजापूर नाका पो.स्टे. गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
सोलापूर : एकांतात मोबाईलमध्ये काढलेले फोटो व व्हिडीओ तिचे नातेवाईक-मित्र तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६,४८,५०० रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरुपात घेतल्याच्या गुन्ह्यात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं आरोपीस २४ तासात गजाआड केलंय. कृष्णकांत अमर रिजोरा (रा. जुळे सोलापूर) असं आरोपीचं नांव आहे. त्याच्या ताब्यातून ०४,३०,००० रूपयाचं ७ तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जुळे सोलापुरातील रुबी नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळील रहिवासी कृष्णकांत अमर रिजोरा याने त्याच्या परिचयाच्या तरुणीस जुळे सोलापुरातील नामवंत कॉलेजच्या मागील बाजूस मैदानामध्ये एकांतात भेटण्यास बोलावून घेतले होते. ते दोघे एकत्र भेटले असताना त्याने मोबाईलच्या सहाय्याने फोटो व व्हिडिओ काढले होते.
कृष्णकांतने ती छायाचित्रे आणि ध्वनीचलचित्रफित तिचे नातेवाईक-मित्र तसेच सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन खंडणी मागितली. त्याच्या धमकीला घाबरून तिने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ६,४८,५०० रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरुपात कृष्णकांतला दिला.
याप्रकरणी तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये भा.दं. वि. कलम ३५४,३८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा (रा. ४३ अभिषेक नगर, बालाजी मंगल कार्यालय, सोलापूर) यास गुन्हे प्रकटीकरण पथकानं २४ तासच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकुण ०४,३०,००० रूपयाचे ७ तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त (परीमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग- २) अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड, पोनि श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सपोनि शितलकुमार गायकवाड, पोहेकॉ सचिन हार, पोना गणेश शिर्के, हुसेन शेख, पोकॉ संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, तपासिक अमंलदार पोहेकॉ विनय सोनार, पोना वामन शेळके यांनी पार पाडली.