सोलापूर : दवाखान्यात जाण्याच्या निमित्ताने मुलगी - मुलासह घराबाहेर पडलेली पडलेली विवाहिता परतलेली नाही. ही घटना सोमवारी, २२ एप्रिल रोजी दुपारी निराळे वस्तीतील चिंच नगरात घडली आहे. निशिगंधा आकाश धनवडे असं बेपत्ता झालेल्या महिलेचं नांव आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नोंद झालीय.
निराळे वस्तीतील निशिगंधा धनवडे (वय - २८ वर्षे) दवाखान्याला जाण्याच्या निमित्ताने मुलगी आर्या (वय - ०७ वर्षे) आणि दीड वर्षीय रुद्र नावाच्या मुलास घेऊन दवाखान्याला जाण्याच्या निमित्ताने घराबाहेर पडली होती. ती घरी न परतल्याने नातेवाईक मैत्रिणीकडे सर्वत्र शोध घेतला असता ते सर्व जण मिळून आले नाहीत.
त्यानंतर आकाश आनंद धनवडे यांनी दिलेल्या अर्जानुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टर ला यासंबंधीची नोंद करण्यात आलीय.