Type Here to Get Search Results !

साखर कारखाना परिसरातून मालट्रकची चोरी

               

                       

                                                              (प्रतिकात्मक छायाचित्र)

सोलापूर : साखर भरण्यासाठी कारखान्यावर आलेला बारा टायरचा मालट्रक अज्ञात चोरट्यानं चोरुन नेलाय. ही घटना रविवारी, २१ एप्रिल रोजी सकाळपूर्वी घडलीय. चोरीस गेलेला मालट्रक सुमारे ५ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा असून यासंदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, होटगी रस्त्यावरील बसवेश्वर नगरातील रहिवासी राजकुमार सायबण्णा पुजारी (वय-३८ वर्षे) व्यवसायाने चालक असून, त्याने त्याच्या मालकीचा व ताब्यातील एमएच १३ एक्स ४४५१ क्रमांकाचा मालट्रक सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याकडील साखर भरण्याच्या उद्देशाने शनिवारी रात्री कारखाना परिसरातील पार्किंगमध्ये लावला होता.

हा ट्रक चोरीस गेल्याचा प्रकार रविवारी सकाळी निदर्शनास आला. याप्रकरणी राजकुमार पुजारी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अशोक लेलँड ३११८ मॉडेलचे एमएच १३ एक्स ४४५१ क्रमांकाचे वाहन चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भादवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक गाडवे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.