राज्यात उष्णतेची लाट; सोलापूरचे तापमान ४४ अंशावर

shivrajya patra

सोलापूर : राज्यात तापमानाचा पारा वाढतच चालला असून मंगळवारी, ३० एप्रिल रोजी ४४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद सोलापुरात आहे. ही यंदाच्या आकडेवारीत तापमानाची सर्वोच्च नोंद आहे. किमान तापमानाची नोंद २९.२ इतकी झालीय.

रविवारी सोलापूरकरांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागला.  राज्यामध्ये तापमानाचा पारा रविवारी चढा होता. सोलापुरातही कमाल तापमानाचा पारा ४३.७ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली होती. 

एप्रिलमधील ही दुसरी उष्णतेची लाट होती. मे महिन्यातही असेच वातावरण असू शकेल, असाही अंदाज हवामान विभागाच्या वतीने या निमित्ताने वर्तवण्यात येत आहे.

To Top