... भाईचारा महत्त्वाचा : माजी आमदार दिलीप माने

shivrajya patra

मंद्रुप येथील इफ्तार पार्टीत सुरेश हसापुरेंसह अनेकांची हजेरी

सोलापूर : रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात, यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी इफ्तार पार्टीप्रसंगी सांगितले.

कॉंग्रेस अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष अफजल शेख यांनी शुक्रवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील जामा मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. 

हिंदू-मुस्लीम भाईचारा कायम असावा, अशी अपेक्षा व्यक्त करीत सोलापूर जिल्हा दुध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांनी मुस्लिम बांधवांसह सर्वांना रमजान ईदसाठी शुभेच्छा दिल्या. 


यावेळी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिष पाटील, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष वसिम पठाण, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, सरपंच अनिता कोरे, उपसरपंच भगवान व्हनमाने, माजी उपसरपंच रमेश नवले, पिर शेख साहेब ट्रस्टचे अध्यक्ष शब्बीर मुल्ला, मोतीलाल राठोड, अप्पासाहेब काळे, गंगाधर बिराजदार, माजी सरपंच नजीर आवटे, माजी सरपंच बक्षूभाई मुल्ला, सलीम शेख (सेक्रेटरी), लक्ष्मण सुतार, महादेव टेळे, धनंजय म्हेत्रे, निखिल देशपांडे, बाबूलाल निगेवान, उमाशंकर रावत, अप्पासाहेब शिळ्ळे, मलकारी शेंडगे, संतोष बरूरे, संदीप मेंडगुदले, राम पवार, सिद्धू खरात, दानेश शेख, महमद शेख यांच्यासह हिंदू-मुस्लिम बांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार पंचाक्षरी स्वामी यांनी केले तर मुबारक मोमीन यांनी सर्व उपस्थितांचे आभार  मानले.

To Top