Type Here to Get Search Results !

वंचित अंधारात ... !राहुल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज काढला; वंचित बहुजन आघाडीची माघार ?


सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सर्वात मोठी ब्रेकिंग समोर आलीय. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने राजकारणात खळबळ उडाली राहुल गायकवाड हे दुपारी पाहुणे दोनच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या काही मित्रांसह दाखल झाले. राहुल गायकवाड माघार घेऊन गुपचूप माध्यमांशी ही न बोलता निघून गेले. 

तत्पूर्वी ते उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, हे जेव्हा सोलापुरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांना समजले. तेव्हा काही जणांनी वेळ न दवडता जिल्हाधिकारी कार्यालयाकडं आले. राहुल गायकवाड हे जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये होते. याच वेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे दालनात घुसले. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना मडीखांबे यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या. 

पोलिसांनी वंचितचे जिल्हाध्यक्ष मडीखांबे यांना १० ते १५ मिनिटे आपल्यासमोर बससून घेतले होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी त्यांना सोडून दिले. पोलिसांनी सोडल्यानंतर मडीखांबे यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी माघार घेतल्याने सोलापूर चा राजकारणात खळबळ उडाली आहे. सर्व स्थानिक नेत्यांचेही चेहरे पडले होते, विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनाही याची माहिती न देता गायकवाड यांनी माघार घेतल्याचे समजते.