सोलापूर : जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर करीता छोटी-मोठी २२ वाहने देण्यात आली. शुक्रवारी, २२ मार्च रोजी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथे या नवीन वाहनांचे उद्घाटन करण्यात आले.
जिल्हा नियोजन समिती, सोलापूर यांच्या निधीतून सोलापूर पोलीस आयुक्तालय करीता देण्यात आलेल्या वाहनांमध्ये मिनी बस-०६, महेंद्रा बलेरो निओ-१०, महेंद्रा स्कार्पिओ-०१ आणि हिरो मोटार सायकल ०५ यांचा समावेश आहे.
ही वाहनं सहा. पोलीस आयुक्त (प्रशासन) यांचे ताब्यात देऊन एम.टी.ओ मार्फत जनतेला लवकरात लवकर मदत उपलब्ध करून देण्याकरीता संबंधित पोलीस विभागास वाहन वाटप करण्यासंबंधीचे आदेश पोलीस आयुक्तांनी यावेळी केले.
या कार्यक्रमावेळी पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) प्राजंली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन/नियंत्रण कक्ष) उबाळे, वरीष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार उपस्थित होते.