सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर शूर पराक्रमी पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य आबादीत ठेवले, असं प्रतिपादन श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केलं.
दरवर्षी, ११ मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. हा दिवस बलिदान दिवस म्हणून साजरा केला जातो. छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिले. संभाजी महाराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी आई सोयराबाईच्या पोटी झाला. ०३ एप्रिल १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर, छत्रपती संभाजी राजेंनी स्वराज्याचा कारभार स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्वराज्य अबाधित ठेवले. संभाजी महाराजांना शौर्याबरोबरच निर्भयतेचा वारसाही त्यांचे वडील शिवाजी महाराजांकडून लाभला होता, असंही त्यांनी यावेळी सांगितले.
या शूर पराक्रमी छत्रपती संभाजीराजे यांना त्यांच्या स्मृतिदिनी, सोमवारी श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, माजी अध्यक्ष मतीन बागवान यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय ,छत्रपती संभाजी महाराज की जय, जिजाऊ माँ साहेब की जय' च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
याप्रसंगी राजन जाधव, आबा सावंत, श्रीकांत घाडगे, श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, नाना भोईटे, विजय पुकाळे, अंबादास शेळके, बसवराज कोळी, सचिन स्वामी देविदास घुले यांची उपस्थिती होती.