Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची १४६ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी घोषित; शनिवारी नियुक्तीपत्र प्रदान


सोलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरची १४६ पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी जाहीर केलीय. गुरुवारी सकाळी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत ही कार्यकारिणी घोषित करण्यात आलीय. शनिवारी, २३ मार्च रोजी समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या हस्ते होणार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आलं.

०१ जनरल सेक्रेटरी, १६ उपाध्यक्ष, ०२ प्रवक्ते, ०१ खजिनदार, ३५ सरचिटणीस १७ सचिव ०६ संघटक सचिव, १७ संघटक, ०३ विधानसभा अध्यक्ष, ०३ विधानसभा कार्याध्यक्ष, ०८ मार्गदर्शक व ३१ कायम निमंत्रित, ०१ कायम निमंत्रित सहसचिव, ०४ कार्यकारिणी सदस्यांचा या कार्यकारिणीत समावेश आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सोलापूर जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, आनंद चंदनशिवे यांची मुंबईत ' देवगिरी ' बंगला येथे संघटनात्मक बांधणी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरची आढावा बैठक  पार पडली. या बैठकीत सोलापूर शहर कार्यकारिणीत विविध पदांच्या १४६ पदाधिकाऱ्यांच्या यादीला प्रदेशाध्यक्ष तटकरे, प्रदेश सचिव गर्जे यांनी मान्यता दिलीय.

१४६ नावांच्या नूतन पदाधिकारी कार्यकारिणीत जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, खजिनदार युवराज माने, प्रवक्ते नागेश निंबाळकर, सुहास सावंत, विधानसभा अध्यक्ष अलमेराज आबादी राजे, राजू चव्हाण, अमोल कोटीवाले आणि जेष्ठ मार्गदर्शक व कायम निमंत्रित रविकांत पाटील, शफी इनामदार, राजन जाधव, आनंद चंदनशिवे, हेमंत चौधरी, श्रीनिवास कोंडी, नागेश गायकवाड, ॲड. राजेश देशमुख यांचा समावेश आहे.

या पत्रकार परिषदेस जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, माजी आमदार रविकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, राष्ट्रवादीचे नेते आनंद चंदनशिवे, महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम, प्रिया पवार, लता ढेरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱी उपस्थित होते.