जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनमध्ये २४,३३,८६,०२० रुपयांचा अपहार

shivrajya patra


अविनाश बोमड्याल यांच्यासह १४ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; आरोपीमध्ये ०२ महिलांचा समावेश

सोलापूर : सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन, संस्थेत २४,३३,८६,०२० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी चेअरमन अविनाश प्रकाश बोमडयाल (रा. १५१/२३, रविवार पेठ, सोलापूर) यांच्यासह १४ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रथम विशेष लेखापरिक्षक (वर्ग-२) बप्पाजी छबुराव पवार यांनी या आरोपीविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशन नियमित, डी-२४ ते ३१, भद्रावती कॉम्प्लेक्स, सोलापूर या संस्थेचे पदाधिकारी व इतर संबधित लाभार्थी वरील १ ते १४ यांनी आपआपसात संगणमत करुन ०१ एप्रिल२०२१ रोजी ते ३१ मार्च २०२२ रोजीपर्यंत या आर्थिक वर्षात संस्थेमध्ये २४,३३,८६,०२० रुपये इतक्या  रक्कमेचा गैरव्यवहार करुन, त्यामधील रक्कम आपले स्वतःचे फायद्यासाठी वापरुन त्याचा अपहार करुन, सदर संस्थेची विश्वासघात करुन फसवणूक केली.

बप्पाजी छबुराव पवार (प्रथम विशेष लेखापरिक्षक वर्ग-२, सहकारी संस्था विणकर, सोलापूर) यांनी केलेल्या वैधानिक लेखा परिक्षणात ही गंभीर बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यानुसार बाप्पाची पवार यांनी पोलीस ठाण्यात सोलापूर जिल्हा विणकर सहकारी फेडरेशनच्या पदाधिकारी व लाभार्थ्यासहित १४ जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या आरोपीमध्ये चेअरमन अविनाश प्रकाश बोमड्याल (रा. १५१/२३, रविवार पेठ), संचालक सहदेव मणमंतु इप्पलपल्ली (रा. १७८९, दत्त नगर), श्रीहरी रामण्णा विडप (रा. १६३०, कुचन नगर), संचालक संजय भुमय्या कोंडा (रा. ३०२, डी ८३, भवानी पेठ), संचालक मनोहर पापय्या इगे (रा. १४०९, दाजी पेठ), संचालक यादगिरी बालय्या वड्डेपल्ली (रा. १३२०, भद्रावजी पेठ), संचालक सर्वेशाम शंकरराव येमुल (रा. ११९४, न्यु पाच्छा पेठ), संचालक श्रीहरी हणमय्या इराबत्ती (रा. १५७, साखर पेठ), संचालक व्यंकटेश बालाजी बोगा (रा. १८३८, दत्त नगर, वालचंद कॉलेज जवळ), संचालक लक्ष्मीनारायण शंकर देवसानी (रा. २०१, वेणुगोपाळ नगर), संचालक वेणुगोपाळ केशव अंकम (रा. ९४/२१६, जोडभावी पेठ), संचालिका सौ. कल्पना श्रीरंग रापोल (रा. ३६४, जोडभावी पेठ), संचालिका सौ. मंगम्माबाई कृष्णाहरी आडम (रा. २६/०३, नटराज हौसिंग सोसायटी) आणि प्रभारी व्यवस्थापक रामचंद्र बालराज सामलेटी (रा. १५५८, दाजी पेठ) यांचा समावेश आहे. 

जेलरोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घाडगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.


To Top