Type Here to Get Search Results !

"देऋब्रा" च्या पाठांतर स्पर्धेत १८५ विद्यार्थ्यांचा सहभाग दासनवमीनिमित आयोजन; बुधवारी बक्षिस वितरण

 

सोलापूर : येथील देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेच्यावतीने दासनवमीनिमित्त रविवारी (ता.3) शालेय विद्यार्थ्यांसाठी  मनाचे श्लोक, करूणाष्टके व रामरक्षा यावर आधारीत पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शहरातील सुमारे १८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. 

सरस्वती मंदिर शाळेत घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन कल्याण (मुंबई) येथील गीता मंडळाच्या उपासक राजश्री देशपांडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.श्रीकांत येळेगावकर, कार्यवाह श्याम जोशी, उपाध्यक्ष  विजय कुलकर्णी, खजिनदार सतीश पाटील, कार्यकारिणी सदस्य शंकर कुलकर्णी, रविंद्र तुळजापूरकर, महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर, युवक अध्यक्ष सुशांत कुलकर्णी आदींसह पालक व विविध शाळेतील शिक्षक उपस्थित होते.  

या स्पर्धेत शहरातील विविध शाळांतून छोटा गट ते चौथी इयत्तेतील सुमारे १८५ विद्यार्थी सहभागी झाले होते. शुभदा कुलकर्णी, मीरा धामणगावकर,  अमरजा वासकर, अपर्णा तुळजापूरकर, योजनगंधा जोशी, पद्मजा तारके, स्मिता देशपांडे, मानसी कुलकर्णी, सुवर्णा देशपांडे, शांभवी कणबसकर, दामोदर कुलकर्णी यांनी परिक्षकाचे काम केले. स्पर्धेचा निकाल त्या-त्या शाळेत जाहीर करण्यात आला. 

पारितोषिक वितरण कार्यक्रम बुधवारी, ०६ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता दत्त चौकातील रामदास संकुलातील संस्था कार्यालयात होणार आहे. यावेळी बक्षिसासह सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.