- १२ मार्चला मुंबईत वितरण
सोलापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी समाज कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्टयपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून शासनाच्या वतीने पात्र व्यक्ती व संस्थांचा यथोचित सन्मान करुन गौरविण्यात येते. या अनुषंगाने विविध पुरस्काराची घोषणा शुक्रवारी शासनाने केली असून, जिल्ह्यातील ५ व्यक्तींची निवड करण्यात आली असल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिलीय.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार यांचे नावाने पात्र व्यक्ती व संस्थांचा यथोचित सन्मान करुन गौरविण्यात येते. समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी जिल्ह्यातील ०५ रस्कार घोषित व्यक्तींची भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
पुरस्कारचे वितरण मुंबई येथील नॅशनल, सेंटर फॉर परफॉर्मिग आटस, जमशेद भाभा नाट्यगृह, एन सी पी ए मार्ग, नरीमन पाइंट, मुंबई येथे मंगळवारी, १२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
... यांचा होणार सन्मान :
विठ्ठल अण्णा पाथरुट (सन-2019-20- डॉ. बाबासाहेब आंबेडकर समान भुषण पुरस्कार),
विलास भिवा लेंगरे (सन-2019-20-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समान भुषण पुरस्कार),
प्रवीण दत्तात्रय माने (सन-2021-22-डॉ. बाबासाहेब आंबेडकर समान भुषण पुरस्कार),
सुरेश वसंत कसबे (सन-2019-20 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार),
जयद्रथ तुकाराम जाधव (सन-2021-22 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती समाजकल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी दिलीय.