सोलापूर : तेरे को केस करना है करलो, हम खेत बेचकर केस लडते, असं म्हणत एका दांम्पत्यास लोखंडी सळई व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यात आलीय. ही घटना गुरुवारी, २९ फेब्रुवारी रोजी रात्री लष्कर परिसरातील लोधी गल्लीत घडली. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार सदर बझार पोलीस ठाण्यात ०५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर सदर बझार लोधी गल्लीतील रहिवासी मुकेश बुरहानपुरे, त्या रात्री ०९ वा. च्या सुमारास लघुशंखेच्या निमित्ताने घराबाहेर गेला होता. त्यास पाहून सुरेश कोल्हापुरे यांनी मोठमोठ्याने शिवीगाळी केली. त्यावेळी त्यास 'हमारे पिछे क्यु लगा, हम दोनो पडोसी है, ठिक से रहना नही आता क्या' असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी सुरेश कोल्हापुरे, किरण हजारीवाले, पृथ्वी हजारेवाले, काल्या बाबावाले, आणि मुयरी कोल्हापुरे (सर्व रा. उत्तर सदर बझार, लोधी गल्ली, सोलापूर) यांनी समजावून सांगत असताना 'तेरे को केस करना है करलो, हम खेत बेचकर केस लडते ', असं म्हणत लोखंडी सळई, फरशी आणि लाथा-बुक्क्यांनी त्यास व विड्या वळत बसलेल्या त्याच्या पत्नीस जबर मारहाण केली. सदर बझार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलकर्णी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.