Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी अभ्यागतांना 'या' दिवशी भेटतील दुपारी ०३ ते सायं. ०५ वा. या वेळेत


सोलापूर : लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने अभ्यागतांनी कार्यालयीन कामकाजी दिवसांमध्ये सोमवार व शुक्रवार या दोन दिवशीच दुपारी ०३.o० ते सायंकाळी ०५.००  या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांची भेट घ्यावी, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाव्दारे देण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या भेटीसाठी येणाऱ्या अभ्यागतांनी निश्चित केलेल्या वेळेतच  जिल्हाधिकारी यांची भेट घ्यावी. ही वेळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीपर्यंत राहणार असून त्यानंतर पूर्वीप्रमाणेच अभ्यागत भेटण्याची वेळ दररोज राहील. तरी अभ्यागातांनी जिल्हाधिकारी यांना भेटण्यासाठी झालेल्या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे करण्यात आले आहे.