सोलापूर : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण हे दि ८ व ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी ७.१५ वाजता सांगली येथून पंढरपूरकडे प्रयाण. रात्री ९.०० वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे आगमन व राखीव.
शुक्रवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ०८.०० वाजता श्री. क्षेत्र पंढरपूर देवस्थान येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शन. सकाळी ०९.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग, पंढरपूर सां.बा उपविभाग पंढरपूर व सां.बा उपविभाग (रोहयो), पंढरपूर या कार्यालयीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी १०:०० वाजता HAM PN-52/53 (मायणी- दिघंची- महुद- पंढरपूर व जिल्हा हद्द पंढरपूर) अंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती (श्री. संत एकनाथ महाराज पालखी मार्ग),सकाळी १०:३० वाजता शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गंत प्रगतीत असलेल्या कामांचा आढावा व सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आभासी पद्धतीने लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमास मा. पालकमंत्री सोलापूर महोदयांसमवेत उपस्थिती. सकाळी ११:३० वाजता शासकीय विश्रामगृह माळशिरस येथील नवीन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १२:०० वाजता जिल्हा न्यायालय माळशिरसच्या इमारतीच्या कामाची पाहणी. दुपारी १२:३० वाजता HAM PN-151 अंतर्गत कळंबोली- नातेपुते- शिंगणापूर या रस्त्याच्या पूर्ण झालेल्या कामाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी ०१:०० वाजता शासकीय विश्रामगृह, अकलूज जिल्हा सोलापूर येथे आगमन व राखीव. दुपारी ०२:०० वाजता अकलूज येथून बारामतीकडे प्रयाण.