सोलापूर : वाहन खरेदीत ठरलेल्या सौद्यापैकी ०१ लाख रूपये हे अॅडव्हान्स म्हणून देऊन उर्वरित ०३ न देता, वाहन विक्रेत्याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनिष काळजे यांच्यासह दोघांविरुध्द एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अक्कलकोट रस्त्यावरील सृष्टी विहार मधील रहिवासी विठ्ठल दत्तात्रय मुनगा पाटील (वय-३९ वर्षे) याचा जुन्या गाड्या खरेदी करून विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडील एमएच ०४ एफ एन ७८७८ हे वाहन मनीष काळजी आणि आकाश मुदगल यांना दाखविले, तेव्हा काळजे यांनी ती गाडी पसंद असल्याचे सांगून ४ लाख रूपयांना गाडीचा सौदा केला.
त्या चार चाकी वाहनाच्या ठरलेल्या किंमतीपैकी एक लाख रुपये ऍडव्हान्स म्हणून दिले, उर्वरित रक्कम दोन दिवसात देण्याचे सांगितले होते. काळजे व त्यांचा साथीदार आकाश मुदगल यांनी तेव्हा त्यांच्याकडे वापरात ठेवून घेतले, मात्र सौद्यातील उर्वरित ०३ लाख रुपये न देता मुनगा पाटील यांची फसवणूक केली, ती रक्कम मागितली असता, दमदाटी केलीय. याप्रकरणी दाखल फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसांनी मनीष काळजे आणि त्यांच्या साथीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. सपोनि कुकडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.